विठ्ठल तो आला आला मला | vitthal to ala ala mala mala

Vitthal To Ala Ala Mala Mala Lyrics

विठ्ठल तो आला, आला, मला भेटण्याला
मला भेटण्याला आला, मला भेटण्याला

तुळशीमाळ घालुनि गळा, कधी नाही कुटले टाळ
पंढरीला नाही गेले चुकूनिया एक वेळ
देव्हाऱ्यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ
चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला

सत्य वाचा माझी होती, वाचली न गाथा पोथी
घाली पाणी तुळशीला, आगळीच माझी भक्ती
शिकवण मनाची ती बंधुभाव सर्वांभूती
विसरून धर्म जाती, देई घास भुकेल्याला

Vitthal To Ala Ala Mala Mala Lyrics

Leave a Comment