Tumhi Kiti Bhi Lava Shakti Lyrics – Anand Shinde

Tumhi Kiti Bhi Lava Shakti Lyrics

लय मजबूत भिमाचा किल्ला

तुम्ही किती बी लावा शक्ती,
अन किती पण लढवा युक्ती ।
तुम्ही कराल किती हि हल्ला,
लय मजबूत भिमाचा किल्ला

रक्त तिळ तिळ ते आटवून,
किल्ला बांधून ठेवलाय त्याने ।
किल्ल्यावरी ते निळ निशाण,
फडकवलंय माझ्या भिमाने ।
बाबासाहेबांचा विजय असो,
वाघ भित नाही मांजरीच्या पिल्ला ।।१।।

शूर भिमाचा खरा शिपाई,
आता दलित राहिला नाही ।
किल्ल्यावर जर केली चढाई,
घ्यावं समजून झालीच लाही ।
बाबासाहेबांचा विजय असो,
लय मजबूत भिमाचा किल्ला ।।२।।

करा गणिमी कावा तुम्ही,
स्वारी परतून लावू आम्ही ।
चिरवू आम्हीच रेखुम खुमी,
नाही आमच्यांत कसली कमी ।
करु मणकाच त्यांचा ढिल्ला,
लय मजबूत भिमाचा किल्ला ।।३।।

Tumhi Kiti Bhi Lava Shakti Lyrics

Leave a Comment