Sajari Bhim Jayanti Karu Lyrics
ज्ञान पिपासू युगंधराच्या…३
ज्ञान पीपासु युगंधराच्या.२
आठवणींना स्मरू.
साजरी भीम जयंती करू.
राष्ट्र कोहिनर भिमरायांना
सहर्ष देऊ मानवंदना.।२।
पाईक आम्ही सदैव त्यांच्या.।२।
ध्येय पठी वावरू…
साजरी भीम जयंती करू…।२।
संघटीत व्हा शिकुनी सारे
प्रगती स्तव संघर्ष करा रे.।२।
प्रेरत त्यांच्या उपदेशांचा.।२।
वसा अंतरी धरू.
साजरी भीम जयंती करू.।२।
शिल्पकार ते सविंधानाचे
उद्धारक ते उपेक्षितांचे.।२।
ज्वलंत त्यांच्या राष्ट्र भक्तीची.।२।
मशाल हाती धरू.
साजरी भीम जयंती करू.।२।
ज्ञान पीपासू युगंधराच्या .।२।
आठवणींना स्मरू.
साजरी भीम जयंती करू.।२।