नवकोटीची माता रमाई | Navkotichi Mata Ramaai Lyrics

Navkotichi Mata Ramaai Lyrics

नवकोटीची माता अशी ही…
उधार अंतःकरणाची,
रमाई झाली स्फूर्ती ज्योती भिमराव आंबेडकरांची…
भिमराव आंबेडकरांची…

थोर महिला आम्ही जानीली गरीब अबला वृद्धात,
थोर तीचे कर्तव्य सांगे इतिहसाचा सिद्धांत,
करनी तियेच्या जुळे मालिका…
कोटी कोटी करांची,
रमाई झाली स्फूर्ती ज्योती भिमराव आंबेडकरांची…

पती निश्चिचेचा वसा पाहीला लाखो नजरा सांगती,
अशी भिमाला पत्नी लाभली अवघे जन हे बोलती…
आंतरातली आस बोलकी…
दलितांच्या उद्धाराची,
रमाई झाली स्फूर्ती ज्योती भिमराव आंबेडकरांची…

निरक्षर हा समाज दुबळा
कुठे तयांची पायरी,
रमाबाईचे नशीब मोठे
झाली भिमाची नवरी…
हसत मुखाने सदा ओढली…
गाडी ही संसाराची,
रमाई झाली स्फूर्ती ज्योती भिमराव आंबेडकरांची…

भिमरायाच्या सहवासाने सार्थ झाहले जीवन हे,
माता रमाई मनी पावली
अर्पुनिया तनमन हे…
दामोदरा रे गौरव गाथा…
गातो क्रांती वीराची,
रमाई झाली स्फूर्ती ज्योती भिमराव आंबेडकरांची…

नवकोटीची माता अशी ही
उधार अंतःकरणाची,
रमाई झाली स्फूर्ती ज्योती भिमराव आंबेडकरांची……
भिमराव आंबेडकरांची

Navkotichi Mata Ramaai Lyrics

Leave a Comment