Jivala Jivach Daan Lyrics
जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं
जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं
झिजून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं
साऱ्या महारामधी मॅट्रिक नव्हतं कुणी
यश घेऊन आली भीमाची लेखणी
असं अमृताचं पान
माझ्या भीमानं केलं
एका गरीब घरी जन्माला येऊन
तरी शिकावयाची जिद्द उरी घेऊन
अमेरिकेला प्रयाण
माझ्या भीमानं केलं
आला कोलंबियाहून पी एच डी होऊन
दुजी विलायतेची बॅरिस्टरी घेऊन
त्याचंच देशाला दान माझ्या भीमानं केलं
आधी माणुसकीचा दिला आम्हाला धडा
मग प्रेत मनूचे पेटविले धडधडा
असं आम्हा बलवान, माझ्या भीमानं केलं
राजदरबारी अशी केली कारागिरी
लोकशाहीचा धुरा लेऊन आपल्या शिरी
कायद्याचं कार्य महान, माझ्या भीमानं केलं
